उद्योग विश्वमहाराष्ट्र ग्रामीण

Airtel आणि SpaceX यांच्यात मोठा करार, भारतात लवकरच एलॉन मस्कचं सॅटेलाईट इंटरनेट येणार!

Airtel And Spacex Agreement : एलॉन मस्क यांची स्पेस्कएक्स आणि भारती एअरटेल यांच्यात एक करार झाला आहे. या कराराच एअरटेलला भविष्यात फायदा होण्याची शक्यता आहे.

Airtel And Spacex Agreement : आजच्या 5जीच्या जगात लोकांना सर्व सेवा तत्काळ देण्यासाठी टेलकॉम कंपन्या प्रयत्नरत असतात. त्यासाठी हायस्पीड इंटरनेटचा पुरवठा कसा करता येईल, याचा सर्वच टेलकॉम कंपन्या विचार करत असतात. असे असतानाच भारती एअरटेल (Airtel) या कंपनीने थेट स्पेसएक्स (SpaceX) या अवकाश संशोधनात काम करणाऱ्या कंपनीशी मोठा करार केला आहे. या करारामुळे आगामी काळात एअरटेल या कंपनीचा झपाट्याने विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेमका काय करार झाला? 

मिळालेल्या माहितीनुसार भारती एअरटेल आणि अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या मालकीची असलेली स्पेसएक्स या कंपन्यांत एक करार झाला आहे. या कराराअंतर्गत भारतात स्टारलिंक स्टॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू करण्यात येणार आहे. 11 मार्च रोजी या करारासंदर्भात दोन्ही कंपन्यांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एलॉन मस्क भारतात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असताना आता स्टारलिंक आणि भारती एअरटेल यांच्यातला हा करार समोर आला आहे. हा करार म्हणजे एलॉन मस्क यांची भारतातील महत्त्वाची आर्थिक गुंतवणूक असल्याचे म्हटले जात आहे. या करारानंतर मस्क आगामी काळातही  भारतात अन्य क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एअरटेल स्वत:चा विस्तार करण्यावर भर देणार

इंटरनेट पुरवठ्यासंदर्भात भारती एअरटेलने  Eutelsat OneWeb या कंपनीशी अगोदरच एक करार केलेला आहे. त्यानंतर आता एअरटेलने स्टारलिंकशीही नवा करार केला आहे. या कराराच्या मदतीने एअरटेल आगामी काळात देशभरात विशेषत: ज्या भागात त्यांची सेवा पोहोचलेली नाही, तेथे स्वत:चा विस्तार करण्यावर भर देण्याची शक्यता आहे.

स्टारलिंक या कंपनीद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सॅटेलाईट बेस्ड इंटरनेटमुळे एअरटेल या कंपनीला विस्ताराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र हा विस्तार नेमका कसा होणार? याची सध्यातरी कोणताही ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही. याबाबत आगामी काळात चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button