गुटखा माफिया सचिन तारगे च्या मुसक्या आतातरी आवळणार का?
ओ...पोलिसवाले साहेब आता आणखी काय पुरावा पाहिजे!

जालना । प्रतिनिधी
गेल्या अनेक महिन्यापासुन जालना शहरासह जिल्हाभरात अवैध गुटखा पुरविणारा शहरातील संभाजी नगर भागातील गुटखा माफिया सचिन तारगे ह्याच्या मालकीचा असणारा 2 लक्ष रूपयांचा गुटखा सदर बाजार पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यांनी पकडला आहे, गेल्या कितीतरी दिवसांपासुन पोलिसांना चकवा देणार्या माफिया सचिन तारगे याच्या विरोधात आता आणखी काय पुरावा पाहिजे आहे? आतापर्यंत चकवा देणार्या माफियाच्या मुसक्या आवळून जिल्ह्यासह शहरात अवैध गुटखा पुरविणार्या सचिन तारगे वर मकोका दाखल करून त्यास तडीपार करण्याची मागणी होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील सदर बाजर पोलीस स्टेशनच्या पथकाने (दि. 28) रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास अवैध गुटखा वाहतुक करणार्या वाहनावर कारवाई करीत 2 लाख रुपये किंमतीचा अवैध गुटखा जप्त केला असून, वाहनही जप्त केले आहे. याप्रकरणी दोघांविरुध्द सदर बाजार पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पोलीस सुत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, काल दुपारी संभाजीनगर प्रभागातील बालाजी मंदिर परिसरातून एक छोटा हत्ती वाहनातुन गुटख्याची वाहतुक होणार असल्याची माहिती सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरिक्षक संदीप भारती यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी विशेष पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले असता या पथकाने संभाजीनगरात वाहनांची तपासणी सुरु केली होती. त्यात एक छोटा हत्ती (एमएच 20 बीएच 7400) थांबवून त्यामध्ये नेमके काय आहे.
आणि त्या वाहनाचा मालक कोण याबाबत माहिती घेण्यात आली असता हे वाहन अजय वाघमारे यांच्या नावावर असल्याचे आढळून आले. तसेच वाहनाची तपासणी केली असता वेगवेगळ्या कंपन्यांचा प्रतिबंधीत गुटखा मिळून आला. हा 2 लाखाचा गुटखा पोलिसांनी जप्त केला असून, वाहन पोलीस ठाण्यात लावुन अन्न व औषध प्रशासन विभागाला लेखी पत्र देण्यात आले होते. त्यानुसार या विभागाच्या कर्मचार्यांनी आज शुक्रवारी (ता. 28) दिलेल्या फिर्यादिवरुन अजय वाघमारेसह सचिन तारगे (रा. संभाजीनगर) या दोघांविरुध्द भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 123, 223, 275, 3 (5) सह कलम अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत 2 लाखाच्या गुटख्यासह
किमतीचे छोटा हत्ती वाहन, असा एकुण 9 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरिक्षक संदीप भारती, फौजदार शैलेश म्हस्के यांच्या नेतृत्वात पथकातील जमादार रामप्रसाद रंगे, धनाजी कावळे, धनंजय लोंढे यांच्या पथकाने केली.
————————–