आर्थिक घडामोडी

जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची निदर्शने..

औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी..

औरंगजेबची कबर उध्वस्त करा; अन्यथा बाबरी मस्जिदीप्रमाणे औरंगजेबची कबर उध्वस्त करू..

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा इशारा..

जालना :आज दिनांक 17 सोमवार रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने निदर्शने केलीय. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेली औरंगजेबची कबर तातडीने हटवावी असं निवेदन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांना दिलय. खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवावी या मागणीसाठी आज बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समविचारी हिंदू संघटनांनी देखील निदर्शने करून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केलीय. लवकरात लवकर औरंगजेबची कबर उध्वस्त करा; अन्यथा बाबरी मस्जिदीप्रमाणे औरंगजेबची कबर उध्वस्त करू असा इशारा ही यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिलाय.

यावेळी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की

उझबेगी परकीय आक्रमक बाबर याचा वंशज क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर छ. संभाजी महाराज नगर या शहरात आहे. वास्तविक, औरंग्या अहिल्यादेवी नगर येथे मेला व नंतर त्याचे प्रेत काढून ते छ. संभाजीनगर येथे पुरले व त्याठिकाणी त्याची कबर करण्यात आली.

याच औरंग्याने शिख गुरु तेगबहादूर यांची क्रूर हत्या केली. शिख गुरु गोविंदसिंह यांच्या दोन बाल साहेबजा‌द्यांना ते केवळ मुस्लिम होत नाहीत म्हणून त्यांना भिंतीत जिवंतपणी चिणून मारण्यात आले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर त्याचे वर्णन करता येणार नाही अशी भयंकर यातनामय हत्या याने केली. श्री. काशी विश्वेश्वराचे मंदिर याने फोडले, मथुरेला असणाऱ्या सुंदर मंदिरांचा यानेच विध्वंस केला. सोरटी सोमनाथाचे मंदिर पुन्हा एकदा यानेच फोडले, त्र्यंबकेश्वर मंदिर, जेजुरी गड यावर हल्ले केले. हजारो हिंदुंच्या प्रेतांच्या राशी गावाबाहेर रचून हिंदूंची भयानक क्रूर कत्तल केली. छत्रपती शाहू महाराजांचे अनेक वेळा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण केले.

अश्या क्रूरकर्मा व आतातायी औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर हि पूर्णपणे स्वतंत्र भारत देशात गुलामीचेच, अनंत यातनांचे प्रतिक आहे. आम्ही सर्व आपणांस विनंती करतो की, आपण हि कबर पुर्णपणे नष्ट करावी. परकीयांचे कुठलेही नामोनिशाण हे नष्ट झाले पाहिजे. तरी आपण योग्य पद्धतीने हि कबर पुर्णपणे काढून टाकावी. व हे न झाल्यास पूर्व सुचित करून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल हिंदू समाजा बरोबर

छ. संभाजीनगरकडे कार सेवेसाठी कूच करतील व औरंग्याची कबर ध्वस्त करतील. असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले दिलेल्या निवेदनावर व्ही.एच.पी. जिल्हाध्यक्ष शिवरतनजी मुंदडा, व्ही.एच.पी. जिल्हा मंत्री अॅड. अतुलजी उपाध्ये, पंडित अभिषेकजी व्यास महत, जालना, जिल्हा सहसंयोजक बजरंग दल अर्जुनजी डहाळे, यांचे स्वाक्षरी आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button