उद्योग विश्व
जालना:- वाहन विक्रीच्या व्यवहारातून दलालांच्या दोन गटात हाणामारी..
जालन्यातील भोकरदन नाका रामतीर्थ परिसरातील घटना

- जालना शहरातील भोकरदन नाका रामतीर्थ परिसरात जालना- संभाजीनगर महामार्गावर वाहन विक्रीच्या व्यवहारातून दलालांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना आज दिनांक 26 बुधवार रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडलीय तब्बल अर्धातास सुरू असलेल्या या वादामुळे जालना-संभाजीनगर (औरंगाबाद)
महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना या वादामुळे अडथळा निर्माण झाला होता. वाहन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून दलालांच्या दोन गटात हा वाद झाला वादच रूपांतर नंतर तुंबळ हाणामारीत झाल्याचं समोर आलंय.परिसरातील व्यापाऱ्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवल्याची माहिती ही समोर आलीय मात्र नागरिकांना नाहक त्रास या वादामुळे सहन करावा लागलाय. आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.