जालन्यात अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणारा एक जण जेरबंद…
बदनापूर पोलिसांची कारवाई... 7 लाख 48 हजार 905 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त...
जालन्यात अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकास पोलिसांनी जेरबंद केलंय. जालन्याच्या बदनापूर पोलिसांनी ही कारवाई केलीय. या कारवाईत 7 लाख 48 हजार 905 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. जालन्याहून छत्रपती संभाजीनगरकडे एका पिकअप वाहनातून विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती बदनापूर पोलिसांना मिळाली होती. त्या माहिती वरून पोलीस पथकाने सापळा रचून सदरील पिकअप वाहन ताब्यात घेतलंय. यावेळी वाहन चालकाकडे वाहनातील मालाबाबत विचारपूस केली असता त्याने विदेशी दारूची वाहतूक करत असल्याची कबुली दिली. त्यावरून बदनापूर पोलिसांनी सदरील पिकअप वाहन चालक परमेश्वर काळे (वय 25 वर्ष) यास ताब्यात घेऊन 2 लाख 98 हजार 905 रुपये किंमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्यांसह एक पिकअप वाहन असा एकूण 7 लाख 48 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी बदनापूर पोलिस अधिक तपास करीत आहेत. या वेळी पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड, उपनिरीक्षक दिलीप चौरे, पोलीस उपनिरीक्षक अजय जयस्वाल, सहाय्यक फौजदार संतोष सावंत, विष्णू कुंटे, गोविंद डोभाळ, पोलीस हवालदार बाबासाहेब जन्हाड, कैलाश सांबर, प्रताप जोनवाल, रंजीत मोरे, पुनम सिंग गोलवाल, गोपाल बारवाल, इरफान शेख यांनी केली आहे .