जामा मस्जीद चौकातील साडेतीन वर्षापासून बंद पडलेला हायमॕक्स साद बीन मुबारक यांच्या पुढाकारातून सुरु…
माळीपुरा भागातील नागरीकांनी सादबीन मुबारक आणि पत्रकार सय्यद अफसर यांचा केला सत्कार...

जालना शहरामध्ये महत्वाच्या अनेक ठिकाणी चौकामध्ये हायमॕक्स बसवण्यात आलेले आहे. काही दिवससानंतर बंद पडलेले हायमॕक्स नंतर वर्षानुवर्षे तसेच बंद पडून राहतात. त्या-त्या परिसरातील नागरीक हायमॕक्स तसेच पथदिवे चालू करण्यासंबधी प्रशासनाकडे हेलपाटे मारतात. परंतू कुंभकर्णी झोपेत असलेल्या संबंधित प्रशसानास जागे करण्यास सर्व सामान्य नागरीकांना दर वेळेस अपयश येते ही फार मोठी शोकांतीका आहे.
असेच जालना शहरातील माळीपुरा भागातील जामा मस्जिद चौकामध्ये साडेतीन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून हाय मॅक्स बसवण्यात आला होता सदरील ठिकाण हे अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्या ठिकाणी मस्जीद आणि दर्गाह असून रहदारीच्या बाबतीत वर्दळीचा चौक असल्याने या ठिकाणी हायमॕक्स बसविण्यात आला होता. मात्र मागील साडेतीन वर्षापासून हा हायमॅक्स बंद पडलेला असून या चौकामध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले होते. या साडेतीन वर्षांमध्ये परिसरातील अनेक नागरिकांनी अनेक वेळा नगर पालिका त्यानंतर महानगरपालिकेला हेलपाटे मारले, आपल्या भावना व्यक्त केल्या, समस्या सांगितल्या परंतु एकही अधिकाऱ्याने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. शेवटी परिसरातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांना समस्या सांगितले असता मागील काही दिवसांपासून साद बिन मुबारक यांनी महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांसमोर वेळोवेळी ही समस्या मांडली आणि त्यांच्या पुढाकारातून काल दिनांक 26 बुधवार रोजी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी हा हायमॅक्स दुरुस्त केला. साद बिन मुबारक यांच्या पुढाकाराला स्थानिक पत्रकार लोकाधिकार न्युज चे संपादक सय्यद अफसर यांनी साथ दिली आणि त्यांच्या मदतीने रात्री हायमॅक्स सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी या दोघांचा शाल आणि हार घालून सत्कार केला.
सध्या सणावाराचे दिवस असून येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाचे सण साजरे होणार आहेत. अशात या चौकात हायमॅक्स चालू असणे अत्यंत गरजेचे होते. आज ते चालू करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांच्या वतीने समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी ग़ुलाम महेबूब अब्दुल ख़लीक़ (मुतावल्ली जामा मस्जिद जालना) मोहम्मद मोहिब ग़ुलाम महेबूब, शेख मुख्तार, सैय्यद शेकर, अरबाज खान, मालिक अहमद, शेख शोएब, मुसेब कुरैशी, शेख कलीम,
शेख आरिफ, मुगिरा खान,फहीम बिल्डर, शेख रॉसेफ, जुनेद खान, शेख सादिक, शेख वसीम, सय्यद अजीम, शमसुद्दीन, शेख अरबाज, अनस कुरैशी, सय्यद मजीद, शेख जमील नाना, शेख अनीस, सय्यद सादिक, शाहरुख खान, सय्यद अजीम, सय्यद अबरार, शेख अल्फ़ाज़, शेख सरफ़ज़, सय्यद अनस, सय्यद अफसर सह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..