जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं उभारली शेतमालाची गुढी..
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतमालाची गुढी उभारून केला राज्य सरकारचा निषेध...

शेतकरी कर्जमाफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अनोखा आंदोलन…
राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणला…
जालना :आज दिनांक 30 रविवार रोजी दुपारी बारा वाजता जालन्यात शेतकरी कर्जमाफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अनोखं आंदोलन केलंय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतमालाची गुढी उभारून स्वाभिमानीनं राज्य सरकारचा निषेध नोंदविलाय. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिलं होतं. मात्र, महायुती सरकारने अद्याप पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाहीये. शिवाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या आशेवर बसू नका असं सांगत परिस्थिती बघून निर्णय घेऊ असं म्हटलंय.
जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज शेतमालाची गुढी उभारलीय.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वारावर ही गुढी उभारण्यात आली.मोसंबी,संत्रा, गव्हाची वंबी,द्राक्ष,कापूस ,मकयाचं कणीस असा शेतमाल गुढीला बांधून ही गुढी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर उभारुन राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार,मुख्यमंत्री तसेच दोन्हीही उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी केली.दरम्यान अजित पवार यांनी कर्जमाफी बद्दल घुमजाव केलंय,त्यामुळे यापुढे सरकार विरोधात रस्त्यावरची लढाई लढण्याचा ईशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलाय.
यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध निवेदन देण्यात आले प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार राजेंद्र निहाळ यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे,बदनापूर तालुकाध्यक्ष नरेश फटाले, बाबासाहेब दखणे, अंकुश तारख, मुकेश डूचे, अभिजित काळे, उमेश पाष्टे, राजेंद्र शिनगारे, सतीश मोरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.