महाराष्ट्र ग्रामीण
जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत दर्गा शरीफ शाळेचा गौरवशाली विजय:
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा! मुख्यध्यापक इमरान नाना

जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत दर्गा शरीफ शाळेचा गौरवशाली विजय!
जालना:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दर्गा शरीफच्या सय्यद महेक नाजेर, सय्यद तुबा मुदस्सर आणि सय्यद इम्रा नुरोद्दीन या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत शानदार यश संपादन केले. 6 ते 8 गटात 90 गुण मिळवत त्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला!
या यशस्वी कामगिरीसाठी मुख्याध्यापक इमरान खान इनायत खान, सहशिक्षिका फिरदौस फातेमा सय्यद परवीन आणि पदवीधर शिक्षक मोहम्मद आवेज़ इमरान सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या अभिमानास्पद विजयाबद्दल संपूर्ण शाळेत आनंदाचे वातावरण असून विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.