कारचा धक्का लागल्याच्या कारणावरून दुचाकीस्वाराने कारचालकास चाकूने भोसकले… शहरातील मेरिट हॉटेल जवळील घटना..
एकजण हल्लेखोर पोलीसांच्या ताब्यात
जालना प्रतिनिधि
जालना शहरातील जालना-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या मेरिट हॉटेल जवळ एका कारचालकाचा दुचाकी स्वाराला धक्का लागल्याच्या कारणावरून दुचाकीस्वार आणि कार चालकांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाले. याचे रूपांतर भाडणात होऊन दुचाकीस्वाराने फोन करून आपले मित्र बोलावले. यामध्ये कारचालकास धारदार हत्याराने भोसकून गंभीर जखमी करण्यात आले. सदरील घटना दिनांक 14 शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कदिम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे. या घटनेमध्ये कारचालक गंभीर जखमी झाला असून त्यास पुढील उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. महेश शेळके रा.सिध्दीविनायक नगर असे जखमीचे नाव असून ते पुणे येथील असून सध्या कामानिमित्त जालन्यात नातेवाईकांकडे राहत आसल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली.
याप्रकरणी पोलीसांनी नॕशनल नगर भागातून एकाजणास ताब्यात घेतल्याची पोलीस सुत्राकडून माहिती मिळाली.
आज धुलीवंदनाचा सण असून शहरांमध्ये सध्या शांतता असल्याचे डी वाय एस पी अनंत कुलकर्णी यांनी सांगितले. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अफवा पसरू नये तसेच शांतता भंग होईल असे कृत्य करू नये असे कुलकर्णी यांनी आवाहन केले.
कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये दोषी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.