महाराष्ट्र ग्रामीण
मालकाच्या पोरीसोबत ड्रायव्हर नको त्या अवस्थेत दिसला, बीडमधील हत्याकांडात नक्की काय घडलं?
आष्टी तालुक्यात एका चालकाला डांबून ठेवत अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
- बीड: गेल्या काही काळापासून बीडमध्ये हत्या आणि हाणामारीच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. वाल्मीक कराड गँगने मस्साजोगचे सरपंच संतोश देशमुख यांची अमानुष हत्या केल्याने बीडसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला. ही घटना ताजी असताना आता आष्टी तालुक्यात एका चालकाला डांबून ठेवत अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित तरुण ज्या व्यक्तीकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता, त्याच व्यक्तीने ही हत्या केल्याचं समोर आलं आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
विकास बनसोडे असं मयत तरुणाचं नाव आहे. तो मूळचा जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून कामाला होता. क्षीरसागर यांच्या अल्पवयीन मुलीशी विकासचे प्रेम संबंध सुरू आहेत, असा संशय क्षीरसागर यांना काही दिवसांपूर्वी आला होता. याच कारणातून क्षीरसागरने काही दिवसांपूर्वी विकासला कामावरून काढून टाकलं होतं. क्षीरसागरने विकासला कामावरून काढून टाकलं असलं तरी त्याचे मालकाच्या पोरीसोबत प्रेमसंबंध क़ायम होते