मनपा आयुक्तांच्या हलगर्जीमुळे शहरात जिकडेतिकडे कचरा आणि दुर्गंधी पसरत असल्याचा नागरीकांचा आरोप
शहरातील ऊर्दु हायस्कुल परिसरात घाणीचे साम्राज्य,विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका... खाजगी दवाखान्याचा मेडिकल वेस्ट कचरा ऊघड्यावर फेकल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका. दवाखान्याचा कचरा ऊघड्यावर फेकणाऱ्यांवर कारवाई करणार कौन? का सगळेच मुग गिळून गप्प बसणार का?

जालना शहर महानगर पालिका हद्दीमध्ये जिकडे तिकडे चोहीकडे घाण-कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील उर्दू हायस्कूल परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून या कचऱ्याच्या ढिगारांमध्ये मेलेल्या अवस्थेत जनावरे आणून टाकल्याने परिसरामध्ये अत्यंत दुर्गंधी पसरत आहे.महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार ही बाब सुज्ञ नागरिकां कडून सांगण्यात येत आहे. परंतु कोणीही अधिकारी कर्मचारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा नागरिकांच्या आरोप आहे. आज दि.26 बुधवार रोजी दुपारी एक वा. च्या सुमारास शाळेच्या शिक्षकांनी माध्यमांशी संवाद साधत असताना सांगीतले की,जालना शहरातील उर्दू हायस्कूल तसेच विस्डम इंग्लिश स्कूलच्या परिसरामध्ये घाण कचरा दिवसेंदिवस वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. तसेच या कचऱ्या मध्ये खाजगी दवाखान्याचा वेस्ट कचरा अज्ञातांकडून टाकल्याजात आहे.मेडिकल वेस्ट बाबत शासनाचे कडक नियम असताना शासन आणि कायद्याचा धाक नसल्याने अत्यंत घातक असा दवाखान्याचा कचरा मोकळ्या जागेवर आणून टाकला जात असून याकडे मात्र मनपाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांचे किंवा स्वच्छता निरिक्षकाचे लक्ष नसल्याने शहराची वाट लागत आसल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावरून दररोज विद्यार्थ्यांना ये-जा करावे लागते अशातच या घाण कचऱ्या मुळे तसेच दवाखान्याच्या मेडिकल वेस्ट ऊघड्यावरा टाकल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्या विषयी शिक्षकांसह पालकांना सुध्दा चिंता लागली आहे.
मनपा हद्दीत ऊघड्यावरील कचरा कुणीही जाळायचा नाही तसे केल्यास दंड आकारल्या जाईल अशिशा सुचना मनपाने शहरवासीयांना दिलेल्या आहेत.परंतू रस्त्याच्या कडेचा कचरा मनपाचे कर्मचारी ऊचलत नसल्याने ते घाण कचरा दिवसेंदिवस वाढत जातो,परिणामी दुर्गंधी सुटते,ज्याचा परिसरातील नागरिकांन प्रचंड त्रास होतो.त्यामुळे नाईलाजास्तव मोकळ्या जागेवरील कचरा परस्पर जाळल्या जात असल्याने त्याचा धूर परिसरामध्ये पसरून प्रदुषण होत आहे, त्याच प्रमाणे हा शरिरास अत्यंत घातक असलेला हा धुर शाळेच्या खिडकीवाटे वर्गांमध्ये जातो ज्यामुळे विद्यार्थी थेट धुराच्या संपर्कात येऊन आरोग्यास धोका निर्माण होत आहे. तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
मनपा चे आयुक्त तसेच या भागातील स्वच्छता निरीक्षक यांनी जातीने लक्ष घालून लवकरात लवकर परिसरातील घाण कचरा साफ करावा अशी मागणी उर्दू हायस्कूल प्रशासनाच्या वतीने होत आहे.
यावेळी प्रिंसिपल शेख नबील सर, अशरफ सर, हकीम सर, इब्राहिम सर, इसहाक सर, नदीम सर, इशतीयक सर, इरफान सर, जुबेर सर, साबेर सर, अरशद सर, रफिक सर, असिफ सर, सिकंदर सर, सरताज सर, सैफ सर, नसीम सर , बासीत भाई, रजवी भाई, मुजफ्फर सर, मोहजजीब, सामाजिक कार्यकर्ते सात बिनमुबारक यांची उपस्थिती होती..