Uncategorized

नागपूर दंगली संदर्भात आज पुण्यात SDPI चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अज़हर तांबोळी यांनी घेतली पत्रकार परिषद..

पुणे :नागपुर प्रकरणाची निष्पक्ष न्यायालयीन चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई करावी तथा निर्दोष व्यक्तींची धरपकड थांबवून त्यांची तत्काळ सुटका करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दंगलीच्या दोषीवर कारवाई करताना सत्तापक्ष भेदभाव करीत आहे. हिंदुत्ववादी गुंडाना पाठिशी घालून, त्यांना सरंक्षण देऊन मुस्लिम समाजातील निर्दोष तरुणांची धरपकड केली जात आहे. ‘सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’ (SDPI) निर्दोषांच्या अटकांचा जाहीर निषेध नोंदवते व दोषींना त्वरीत अटक करण्याची मागणी करते. त्याचप्रमाणे निर्दोष व्यक्तींची घरकपड थांबवून त्यांची त्वरीत सुटका करावी, घटनेचा न्यायालयाच्या देखरेखीत निपक्षपाती तपास करावा, अशी मागणी SDPI करीत आहे.

 

SDPIचा आरोप करत आहे की, नागपूरची दंगली भाजपच्या दोन वरीष्ठ नेत्यांच्या सत्तास्पर्धेतून घडविण्यात आली आहे. या दोन नेत्यांच्या परस्पर स्पर्धेत नागपूर शहरातील निष्पाप मुस्लिमांचा बळी घेतला जात आहे. १५ मार्च रोजी नागपूरला केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक विकास व कल्याणाच्या दृष्टीने एक महत्वाचे विधान केले. त्यात त्यांनी म्हटले, मला (भाजप समर्थकांची) मते मिळो अथवा न मिळो मी अशाच प्रकारे काम करतो, मी निवडणूक हरलो किंवा मंत्रिपद मिळाले नाही तर मी काय मरणार नाही. मात्र मी माझ्या भूमिकेवर आधीपासून ठाम आहे आणि राहील. रविवारी गडकरींचे हे भाषण छापून आले अन् सोमवारी दंगल घडली. यातून गडकरींच्या प्रतिस्पर्थ्यांना काय संदेश द्यायचा आहे?

 

रमजानच्या पवित्र महिन्यात अशा प्रक्रारची दंगल घडवून महाराष्ट्रातील मुस्लिमांना अस्थिर करण्याचा डाव सत्ताधारी महायुती आखत आहे. दंगलीत कुरआनच्या आयती असलेली चादर जाळण्यात आली. टीव्हीवरून सबंध जगाने ही घटना पहिली. परंतु मुख्यमंत्री महोदयांना ते दिसले नाही. विधानसभेत ते खोटे बोलतात. हिंदुत्ववादी गुंडानी घडवलेल्या दंगलीची वस्तुस्थिती विधानसभेच्या कामकाजात नोंदवली जाऊ नये, म्हणून ते सत्य लपवित आहेत. अशा प्रकारचे खोटे विधान करून मुख्यमंत्र्यांना काय साध्य करायचे आहे?

 

दंगलीशी ज्या मुस्लिमांचा संबंध नाही, अशा निष्पापांना अटक करून घटनात्मक मूल्याची पायमल्ली केली जात आहे. धार्मिक आधारावर भेदभाव करून सामान्य मुस्लिमांना लक्ष्य केले जात आहे. SDPI मागणी करते की, पोलिसांनी निर्दोषांची घरकड करण्याऐवजी दोषींवर कार्रवाई करावी पोलीस राजकीय पक्षनेत्यांच्या दबावाखाली काम करीत आहे. नितिन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तास्पर्धेतून ही दंगल घडवून आणण्यात आली असा स्पष्ट आरोप SDPI करीत आहे.

 

नागपूरला घडलेली दंगल पूर्वनियोजित होती, यात काहीच संशय नाही कारण मुस्लिम बांधव चादर जाळल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले होते, परंतु पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवर काहीच कारवाई केली नाही, उलट काही तासातच दंगल घडते. पोलीस असे का वागले दंगलीत हिंदुत्ववादी संघटनांचा उघडपणे समावेश दिसून आला, तरीही पोलीस या गुंडाना पाठिशी का घालत आहे. कशामुळे?

SDPIचा आरोप आहे की, ही दंगल सरकार पुरस्कृत आहे. गृहमंत्रालयाने हिंदुत्ववादी गुंडाना पाठिशी घालण्याचे काम सुरू केले आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीत तपास व्हावा, अशी मागणी SDPI करत आहे. तसेच मुस्लिम मोहल्ल्यावर लावण्यात आलेल्या कर्फ्यूत शिथिलता आणावी. त्याचप्रमाणे वाचाळ भाजपच्या पुढाऱ्यांना आवर घालावा, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आपली चिथावणीखोर भाषणे थांबवावी, अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button