नागरिकांनी आगामी सण – उत्सव शांततेत साजरे करण्याचं पोलिसांचं आवाहन…
मामा चौक व फुल बाजार मध्ये सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन...

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा दिला संदेश…
जालना: सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज दि.28 शुक्रवार रोजी दुपारी
शहरातील मामाचौक,सिंधी बाजार या मुख्य बाजारपेठेतून पथसंचलन केलंय. यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश पोलिसांनी दिलाय. गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यासारखे सण उत्सव आगामी काळात साजरे होणार आहेत. या सण उत्सवांच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच सार्वजनिक शांतता अबाधित राहावी यासाठी जालन्यात आज सदर बाजार पोलीस आणि कदिम जालना पोलिसांनी पथसंंचालन केलय. यावेळी पोलिसांच्या सशस्त्र पथसंंचालनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतलं होतं. दरम्यान, जालन्यातील नागरिकांनी आगामी सण – उत्सव शांततेत साजरे करावेत असं आवाहन ही यावेळी पोलिसांमार्फत करण्यात आलंय.