*पवित्र रमजान महिन्यात केलेले पवित्र कार्य
जावेद खान अध्यक्ष: उम्मत सामाजीक संस्था

पुणे :काल मला माझे मित्र मायकल साठे यानी कॉल केला की त्यांच्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहणारे सुधीर किंकळे वय : 70 पत्ता 286 रास्ता पेठ , पुणे. हे त्यांच्या घरी मृत पावले आहेत आणि त्यांना फक्त त्यांची बहीणच आहे जयश्री किंकळे त्यांना कोणीही नातेवाईक नाहीत त्यामुळे तु त्यांचा अंत्यविधी करतोस का.
संपूर्ण माहिती घेऊन मी ससून रुग्णालयातील डेड हाउस मध्ये पोहोचलो तिथे जयश्री ताई आणि पोलीस हवालदार होळकर साहेब भेटले पंचनामा सुरु होता आणि संध्याकाळ होणार होती चौकशी केली असता मृतदेह मिळण्यास रात्र होणार होती मी जयश्री ताईंना बोललो आपण अंत्यविधी करुन टाकु यात त्या बोलल्या आम्ही ब्राह्मण आहोत आणि सूर्यास्त झाल्यावर आम्ही अंत्यविधी नाही करत आपण सकाळी करू प्लीज त्यांची विनंती आणि रडने मला सहन होत नव्हते आणि रमजान महिना चालु त्यात दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आमची सर्वात मोठी रमजान रात्र आणि नमाज माझ्यासाठी मोठा धार्मिक दिवस पण मनात विचार केला की हे कार्य करण्यासाठी अल्लाहने तुला निवडले असेल कदाचित #जात_धर्म बाजूला ठेऊन सकाळी लवकरच उठलो आज खुप काम होत सगळेच बाजूला ठेऊन ससूनला शुभम आणि शेरू या दोघांना पाठवले. त्यांना अजून एका शुभमची साथ लाभली मायकल कॉल करत होता त्याला बोललो वैकुंठ येथे पोहोच आणि तिथे आम्ही सगळेच त्या सुधीर काकाचे नातेवाईक झाले आणि त्यांचा अंत्यसंस्कार केले.