राजकीय द्वेषापोटी माझ्या नावाची बदनामी- विष्णु पाचफुले
*कन्हैयानगर येथील बॅनर फाडणाऱ्यांशी माझे काही संबंध नाही*

जालना- जालन्यातील कन्हैयानगर येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे बॅनर फाडणाऱ्यांशी आपला काहीही संबंध नसून शिवसेनेतर्फे महापौर पदासाठी आपली उमेदवार म्हणून घोषणा झाल्याने राजकीय द्वेषापोटी आपली बदनामी केली जात असल्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णु पाचफुले यांनी म्हटले आहे.
याबाबत प्रसार माध्यमांशी बोलतांना पाचफुले म्हणाले की, कन्हैयानगर येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे बॅनर फाडणाऱ्या तरूणासोबत असलेले असलेले आपले फोटो समाज माध्यमावर प्रसारित झाले आहे. मुळात बॅनर फाडणाऱ्यांशी आपला काही एक संबंध नाही, शिवसेनेचा शहरप्रमुख असल्याने शिवाय आमचे नेते आमदार अर्जूनराव खोतकर यांनी महापौर पदासाठी उमेदवार म्हणून आपल्या नावाची घोषणा केल्याने विरोधक राजकीय द्वेषापोटी आपल्या नावाची बदनामी करीत असून बॅनर फाडणाऱ्या तरूणाचा व आपला काही संबंध नसल्याचा पुनरूच्चारही पाचफुले यांनी यावेळी बोलताना केला.
यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, मराठा महासंघाचे जिल्हा कोषाध्यक्ष अशोक पडून, मेघराज चौधरी ,शुभम जयस्वाल ,शुभम टेकाळे आदींची उपस्थिती होती.