आर्थिक घडामोडी

सामाजीक कार्याचा आव आणणार्‍या रतन लांडगेचा बुरखा टराटरा फाटला

ब्लकमेलर रतन लांडगेनी शेतकर्‍यांना घातला 12 लाखांना गंडा, तक्रार दाखल

जालना शहरात सामाजीक कार्याचा आव आणणारे महोदय रतन लांडगे यांच्या ब्लकमेंलींग चा बुरखा टराटरा फाडला असुन बीड येथील शेतकर्‍यांना त्याने अमिष दाखवून 12 लाखांना गंडा घातल्याचे समोर प्रकार समोर आला आहे, यापुर्वी देखील अनेकांना ब्लकमेल करून लाखो रूपयांची माया जमविणार्‍या रतन लांडगे याला पोलिसांनी बेड्या ठोकण्याची मागणी जिल्ह्यातील नागरीक करू लागले आहेत.

याबाबत अधिक वृत्त असे की, पैशांचा पाऊस पाडुन देत म्हणुन नंतर भुत दाखवून जादुटोना करीत बीडच्या चार शेतकर्‍यांना तब्बल 12 लाख रुपयांची फसवणुक केल्याची तक्रार तालुका जालना पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस निरिक्षकांना दिलेल्या तक्रारीत बीड येथील बदामराव किसनगराव नलवडे (वय 55), भागवत रावसाहेब देवडे (वय 42), अमोल राजेभाऊ भोसले (वय 40) आणि संदीप सुनील भोसले (वय 33) यांनी असे म्हटले आहे की, आमचा शेतीचा व्यवसाय असून, आम्हाला जालना शहराजवळील इंदेवाडी येथील सिध्दार्थ नगरातील रतन आसाराम लांगडे हा त्याच्या घरी पैशांचा पाऊस पाडून पैसे दुप्पट करुन देत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे आम्ही दि. 28 ऑक्टोबर 2024 रोजी रतन लांडगे याच्या घरी गेलो आणि त्याच्याशी संपर्क साधला असता त्याने 11 लाख 70 हजार रुपये रोख आणि 30 हजार फोन पेव्दारे आमच्याकडून घेतले. इतकेच नव्हे तर त्याने पैशांचा पाऊस पाडून ते पैसे आमच्यासमोर एका गोणीत भरुन ठेवले.

ही गोणी आम्ही घेवून निघण्याचा प्रयत्न केला असता त्याने जादुटोना करुन आमच्यासमोर भुत उभे केले त्यामुळे आम्हाला पैशाची गोणी घेवुन तेथून जाता आले नाही. त्यानंतर तो पुन्हा आम्हाला आढळून आला नाही. त्यामुळे अंधश्रध्दा दाखवुन रतन लांडगे याने आमची 12 लाख रुपयांची फसवणुक केली असून, त्याच्याविरुध्द कारवाई करुन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी या चौघांनी पोलीसांकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button