शेतकऱ्याचे अपहरण करुन त्यास 25 लाख रुपये खंडणी मागणारे (05) दरोडेखोर जेरबंद
जालन्याच्या मौजपुरी पोलिसांची कारवाई

जालना,:
शेतकऱ्याचे अपहरण करुन त्यास 25 लाख रुपये खंडणी मागणाऱ्या (05) दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केलंय. जालन्याच्या मौजपुरी पोलिसांनी ही कारवाई केलीय. पोलीस ठाणे मौजपुरी जि. जालना येथील शेतकरी फिर्यादी निवृत्ती तांगडे रा.धानोरा ता.जि. जालना यांनी तक्रार दिली कि, दिनांक 22/03/2025 रोजी रात्री 01.30 वाजेच्या सुमारास फिर्यादी मौजे धानोरा येथील त्यांच्या राहत्या घराच्या बाहेर झोपलेले असतांना 05 ते 07 अज्ञात चोटयांनी त्यांचे तोंड दाबुन त्यांना त्यांच्या गाडीमध्ये टाकुन जालना मंठा हायवे रोडने जालनाच्या दिशेने घेऊन गेले व त्यांच्या खिशातील 15,000/- हजार रोख रक्कम काढून घेऊन त्यांना जिवे न मारता सोडुन देण्यासाठी 25 लाख रुपयाची खंडणी मागीतली. फिर्यादी हे घाबरलेले असल्याने दरोडेखोरांना खंडणी म्हणून 25 लाख रु. देण्याचे मान्य केल्याने त्यांना मौजे घोडेगाव फाटा ता.जि. जालना येथे रात्री आणुन सोडुन दिले. त्यानंतर दिनांक 22/03/2025 रोजी दुपारी 04.00 वाजे सुमारास दरोडेखोरांनी फिर्यादी यांना त्यांच्या फोनवर संपर्क करुन त्यांना धमकावुन खंडणी म्हणुन 25 लाख रु. दे अन्यथा तुझ् यासह तुझ्या कुटुंबालाही संपवुन टाकु अशी धमकी दिल्याने फिर्यादी यांनी पोलीस ठाणे मौजपुरी येथे हजर येऊन दिलेल्या फिर्यादी प्रमाणे पोलीस ठाणे मौजपुरी जि. जालना येथे कलम 309 (04), 140(2),351(2)(3),3(5) 310(2) भा. न्या. सं प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्हा उघड करुन आरोपी निष्पन्न करणे बाबत पोलीस अधीक्षक साहेब, जालना यांनी व ईतर वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हा उघडकिस करुन आरोपी अटक करणेबाबत सुचना दिल्या त्यानुसार वरीष्ठांनी दिलेल्या सुचना प्रमाणे सदर गुन्हयाबाबत फिर्यादी यांचेकडुन गुन्हयाबाबत सविस्तर हकीकत समजावुन घेऊन डुकरी पिंपरी टोलनाका येथील सी.सी.टि.व्ही फुटेज चेक करुन फिर्यादी यांनी सांगीतलेल्या वाहनाचे वर्णनाप्रमाणे एक स्कार्पिओ वाहन विना क्रमांकाचे दिसले सदर वाहनाचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती काढुन तसेच तांत्रिक विश्लेषणातुन सदर गुन्हयात आरोपी 1) गणेश तात्याराव श्रीखंडे 2) रामप्रसाद ऊर्फ बाळु डिगांबर शिंदे दोघे रा. सावरगाव (हडप) ता.जि. जालना 3) आकाश अशोक घुले रा. मुकींदपुर, नेवासा फाटा जि. अहिल्यानगर 4) विशाल ऊर्फ गजानन डोंगरे रा. सावरगाव (हडप) ता.जि.जालना 5) आकाश तुकाराम रंधवे रा.हडप ता.जि. जालना यांना नमुद गुन्हयात अटक करुन त्यांना विश्वासात घेऊन त्यांना गुन्हयाबाबत विचारपुस केली असताना त्यांनी आरोपी नामे अनिकेत गोरख उकांडे रा. अकोलनेर जि. अहिल्यानगर व शाम चव्हाण रा.साळेगाव तांडा ह.मु. सरस्वती मंदिराच्या पाठीमागे खरपुडी, जालना (फरार आरोपी) यांच्या मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपीतांच्या ताब्यातुन गुन्हया वापरलेले एक स्कार्पिओ वाहन क्र.- MH-23-AS-7272 व आरोपीतांचे मोबाईल असे एकुण (9,80,000/-) रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन आरोपीतांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपीतांचा 04 दिवस पी.सी. आर मंजुर केला असुन गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे. सदर चा गुन्हा हा अजयकुमार बंन्सल, पोलीस अधीक्षक, जालना, आयुष नोपाणी साहेब, अपर पोलीस अधीक्षक, जालना, दादाहरी चौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग परतुर तसेच पंकज जाधव, पो.नि.स्थागुशा, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कामगीरी ही मिथुन घुगे, सहा. पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी पो.स्टे मौजपुरी, पोउपनि विजय तडवी, ग्रे. पोउपनि जाधव सफौ चंद्रकांत पवार, ज्ञानोबा बिरादार, मच्छिद्र वाघ, दिलीप गोडबोले, नितीन खरात, राजेंद्र देशमुख, भास्कर वाघ, सतिष गोफणे, नितीन कोकणे, प्रदिप पाचरणे, अविनाश मांटे, धोंडीराम वाघमारे, प्रशांत म्हस्के, सदाशिव खैरे, कैलास शिवणकर, तसेच स्थागुशा चे तांत्रिक विश्लेषण करणारे सागर बावीस्कर यांनी केली आहे.