Uncategorized
शिरड शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रोत्साहन वर बक्षिसांचे वाटप :
शिरड़ शहापूर औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे दिनांक 22 मार्च रोजी तालुका आरोग्य औंढा नागनाथ कार्यालयामार्फत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ कार्यक्रम आर.के. एस.के.अंतर्गत 110 पियर एज्युकेटर किशोरवयीन मुला-मुलींना प्रोत्साहन बक्षिसांचे वाटप मुस्लिम सेवा संघ महिला जिल्हा अध्यक्ष हिंगोली नाजेमा सयद मुजाहेद यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळेस तालुका आरोग्य अधिकारी गजानन चव्हाण वैद्यकीय अधिकारी विठ्ठल टाले, आरोग्य सेविका आरोग्य केंद्रातील कर्मचारी व पियर एज्युकेटर मुला मुलींची उपस्थिती होती.!