महाराष्ट्र ग्रामीण

समृद्धी महामार्गवर सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकला दुसरा आयशर ट्रक जोराने धडकला…

घटनेत आयशर ट्रक चालकाचा जागीच मृत्यू, तर क्लिनर गंभीर जखमी... जालन्याच्या समृद्धी महामार्गावरी चॅनल क्र. 383.9 वर घडली घटना.

जालना::आज दिनांक 17 सोमवार रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकला दुसरा आयशर ट्रक जोराने धडकून भीषण अपघात घडलाय. या घटनेत आयशर ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला असून क्लिनर गंभीर जखमी झालाय. जालन्याच्या समृद्धी महामार्गावरी चॅनल क्र. 383.9 वर रात्री अडीच वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडलीय. अंकुरसिंग असं मयत ट्रॅक चालकाचे नाव असून तो उत्तर प्रदेश राज्यातील नगीना येथील रहिवासी आहे. तर लतिफसिंग (रा. चिल्लेपुर, उत्तर प्रदेश) असं जखमी क्लिनरचे नावं आहे.

आयशर ट्रक क्रमांक Mh 17 BY 6980 हा रायपूर हून छत्रपती संभाजीनगर कडे निघाला होता. यादरम्यान जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर सदरील आयशर ट्रक सळईची वाहतूक करणाऱ्या ट्रक क्रमांक Mh 21 BH 4863 ला पाठीमागून जोराने धडकला. यात सळई अंगात घुसून आयशर ट्रक चालक अंकुरसिंग याचा जागीच मृत्यू झाला तर क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा चालक प्रसार झाला. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरि.अशोक काळे,पो.हेड काॕ.बिऱ्हाडे, पो.अमंलादार निकाळजे, MSF चे जवानरवी पवार व राठोड, तसेच ॲम्बुलन्स चालक आनंद भोरे डॉ अमोल देहाडकर QRV संदीप गरजे, व वाघ खंदारे, बाचकर, यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहनांना मदत करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

तातडीने जखमी क्लीनरला रुग्णालयात उपचारासाठी पाठवले तर मयताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे पाठविला आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button