अंगावर पेट्रोल टाकून एका तरुणाने घेतले होते स्वत: ला पेटवून..
जालन्यात नातेवाईक बाॅडी घेऊन थेट एसपी ऑफीसमध्ये..

ॲम्बुलन्सला पोलिसांनी एसपी ऑफिसच्या गेटवरच गाडी अडवली..
पोलिस आणि मृताच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची..
जालना :आज दिनांक पाच शनिवार रोजी दुपारी चार वाजता जालन्यात नातेवाईक तरुणाची बाॅडी घेऊन थेट एसपी ऑफीसमध्ये दाखल झाल्यानं पोलिसांची चांगलीच दमछाक झालीये. जालना जिल्ह्यातल्या वाटूर येथील एका तरुणाने अंगावर पेट्रोल घेऊन स्वत: ला पेटवून घेतले होते. प्रल्हाद शेषराव भागस असं या तरुणाचं नाव होतं. त्याच्या छत्रपती संभाजी नगर येथे उपाचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झालाय. मात्र परतूर पोलिसांनी अद्याप कुणावरही कारवाई केलेली नाहीये. त्यामुळं संतप्त नातेवाईकांनी तरुणाची बाॅडी घेवून थेट एसपी ऑफीसमध्ये आले असताना पोलिसांनी एसपी ऑफिसच्या गेटवरच गाडी अडवली. त्यामुळं पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. यावेळी मृत तरुणाच्या नातेवाईक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी स्वत: रुग्णवाहिकेत बसून तरुणाची बाॅडी त्याच्या गावाकडे घेऊन गेले. दरम्यान यावेळी कारवाई करण्याची मागणी या तरुणाच्या नातेवाईकांनी केली आहे. यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे आपल्या फास्ट फाटा घटनास्थळ दाखल झाले सुरेश उनवणे यांनी मध्यस्थी करून नातेवाईकांना कारवाई करण्याचे आश्वासन दिले