आर्थिक घडामोडी

सात दिवसांत चौकशी करून कारवाई केली जाणार उपअधिक्षक आयुष नोपाणी

इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनला आंदोलनापुर्वीच पोलीस अधिकार्‍यांचे लेखी आश्‍वासन  

सात दिवसांत चौकशी करून कारवाई केली जाणार उपअधिक्षक आयुष नोपाणी

इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनला आंदोलनापुर्वीच पोलीस अधिकार्‍यांचे लेखी आश्‍वासन

 

जालना । प्रतिनिधी – हेल्मेट नाही म्हणून ऑनलाईन चलनच्या ऐवजी नगद रक्कम मागत अरेरावीची भाषा वापरल्याप्रकरणी वाहतुक शाखेच्या पोलीस कर्मचार्‍यांवर कारवाई करत त्याचे निलंबन करण्यात यावे या मागणीसाठी शनिवार (दि 5) रोजी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे आमेर खान, सुनील भारती यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न डफडं बजाओ बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार होते मात्र, शनिवार (दि 5) सकाळीच नऊ वाजता पोलीसांचा मोठा फौजफाटा आंदोलनस्थळी दाखल झाला. कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी आंदोलनकांमध्ये मध्यस्थी करत पोलीस उपअधिक्षक आयुष नोपाणी यांची भेट घालून दिली.

आंदोलकाचे शिष्टमंडळ यांनी उपअधिक्षक श्री नोपाणी यांचे भेट घेत घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर श्री नोपाणी यांनी तातडीने येत्या सात दिवसात चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांना चौकशी करण्याचे निर्देश श्री नोपाणी यांनी दिले आहे. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.

पोलीस उपअधिक्षक आयुष नोपाणी यांना भेट दिलेल्या शिष्टमंडळामध्ये इंडियन जर्नलिस्ट असोचे जालना जिल्हाध्यक्ष आमेर खान, उपाध्यक्ष संदीप भारती, प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके, नाजीम मनियार, बासित बेग, तरंग कांबळे, गणेश सातपुते यांचा समावेश होता.

दरम्यान, आंदोलन स्थगितीनंतर ओबीसीचे नेते नवनाथ वाघमारे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. पोलीसांनी वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावावा, जिल्ह्यात कायदा व सुव्यव्यस्थेचा प्रश्‍न निर्माण होत असतांना काही पोलीस अधिकार्‍यांमुळे पोलीसांचे नाव बदनाम होत आहे. पोलीसांनी अवैध वाळु उपसा, सट्टा, मटका, यावर लक्ष केंद्रीत करावे सर्वसामान्यांना त्रास देणार्‍या काही पोलीस अधिकार्‍यांनी आता पत्रकारांनाही त्रास देणे सुरु केले आहे या गंभीर विषयाकडे पोलीस अधिक्षक यांनी लक्ष द्यावे अशी मागणी श्री वाघमारे यांनी यावेळी केली.

नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रतन लांडगे यांनीही आंदोलनाला जाहीर पाठींबा दिला असून येत्या सात दिवसात पोलीसांनी योग्य ती कारवाई न केल्यास संघटनेच्यावतीने पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून लढा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी पोलीसांनी येत्या सात दिवसात चौकशी करून कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले यावर समाधान व्यक्त केले आहे. त्याच बरोबरच चौकशी करतांना योग्य पद्धतीने चौकशी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करत एकांगी चौकशी केल्या गेल्यास भविष्यात आमेर खान यांच्या आमरण उपोषणात कॉन्सीलचे जालना पदाधिकारी सहभागी होतील असा ईशाराही दिला.

यावेळी जावेद खान, लहू गाडे, सुयोग खर्डेकर, मुजीब शेख, आकाश माने, शिवाजी बावणे, सुनील नरोडे, शेख सलीम, विलास गायकवाड, रईस शेख, गणेश सातपुते, आरेफ सय्यद, मजहर सौदागर, गणेश जाधव, शब्बीर पठाण, लेवी निर्मल, सय्यद अफसर, अशपाक पटेल, नदीम सय्यद, श्रीपत नरेश, विकास बागडी, प्रेम जाधव, नरेंद्र जोगड, शेख शकील आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button