चोरी, घरफोडी करणारे सराईत आरोपी व चोरिचा मालघेणारा इसम जेर बंद,
आरोपीच्या रु, 64,500 कीमतीचा मुद्देमाल जब्त स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई,

जालना जिल्हयात चोरी व घरफोडी करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे पोलिस आधीक्षक साहेबांनि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांना सुचना दिल्या होत्या, त्या अनुषगांने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातिल अधिकारी व अमलदार यांना चोरी व घरफोडी करणाऱ्या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाईचे आदेश दिले होते,
त्या अनुषगांने दिनांक 29/05/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतिल पोलिस अधिकारी व अमलदार यांना गुप्त बातमीदार यांचे मार्फ़तिने माहिती मिळाली की सराईत आरोपी नामे आकाशसिंग़ नरसिंग बावरी, रा, गुरुगोविंदसींगनगर,जालना याने व त्याच्या साथीदाराने मिळून रानीउचेगांव, जालना येथील मोटर मेकेनिकचे दुकान फोडून त्यातील मुद्देमाल चोरी केला आहे, त्याअनुषगांने आरोपी आकाशसींग नरसींग बावरी वय, 35रा, गुरुगोविंदसींग नगर जालना, व त्याचे साथिदार नामे मुकिंदरसींग निक्कीसींग टाक, वय -40 वर्ष रा, गुरुगोविंदसींगनगर, जालना राजसींग कालूसींग टाक,वय -20वर्ष रा जमुना नगर जालना यांचा शोध घेवून त्यांना ताबियात घेवून त्यांच्याकड़े गुन्हयाच्या अनुषगांने चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देवून आरोपीतांनि एम,आय,डी,सि फेज क्र,03,गांधीनगर,गुंडेवाड़ी पानशेंद्रा येथुनही लोखंडी जैक, व्हीटेज जैक,कटर मशीन,जैक लिव्हर, विदयुत मोटार,लोखंडी सळया, मोटार पंप असे आरोपितांनि चोरी करुन घेवून गेले,असून सदर चोरी केलेला मुद्देमाल त्यांनी इसम नामे राजेक मुबारक शेख,वय 24 वर्ष, रा संजयनगर,जूना जालना यास विक्री केले असल्याचे सांगितल्याने आरोपी नामे राजेक शेख यास ताबियात घेवून त्याच्या ताब्यातून रु, 64.500/कीमतीचे लोखंडी जैक. व्हीटेज जैक.कटर मशीन, जैक लीव्हर,विदयुत मोटार असा मुद्देमाल जब्त करण्यात आला आहे..
सदर आरोपितांनि केलेल्या गुन्हायाच्या अभिलेख पड़ताळला असता अंबड़ पोलिस ठाने गु,र,क्र160/25 कलम 303(4)भा,न्या,सं. तालुका पोलिस ठाने गु,र,क्र 145/25कलम 303(2)भा. न्या.सं. चंदनझिरा पोलिस ठाने गु.र,क्र.12/2025कलम 303(2)भा.न्या,सं. गु,र,क्र. 29/2025कलम 303(2)भा.न्या.सं या ठान्यातील एकूण 05गुन्हे उघड झाले आहे..
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक श्री.अजय कुमार बंसल. अप्पर. पोलिस अधीक्षक श्री. आयुष नोपानी. उपविभागीय पोलिस अधिकारी जालना.श्री. अंनत कुलकरणी यांचे मार्गदर्शना खाली श्री पंकज जाधव.पोलिस निरीक्षक स्थागुशा.जालना सह पोलिस निरीक्षक श्री उबाळे, पोलिस उप निरिक्षक राजेंद्र वाघ. पोलिस अमलदार रामप्रसाद पव्हरे. रमेश राठोड. प्रभाकर वाघ.विजय डीक्कर. इरशाद पटेल.संदीप चिंचोले. रमेश काळे. योगेश सहाने.सौरभ मुळे. सर्व स्थागुशायांनी केली आहे…