दहावी परिक्षेत आदीराज दीपक शेळके याचे दैदिप्यमान यश
आदिराज दीपक शेळके चैतन्य गुरुकुल व ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी आहे.

जालना । प्रतिनिधी -चिखली येथील आदीराज दीपक शेळके यांनी इयत्ता दहावीच्या परिक्षेत 94.40 टक्के गुण प्राप्त करून दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
आदीराज शेळके हा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील चैतन्य गुरुकुल व ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी आहे. इयत्ता सातवी पर्यंतचे त्याचे शिक्षण हे जालना येथील श्री. म. स्था. जैन विद्यालयात झाले आहे. आदीराज त्याच्या यशाचे श्रेय हे त्याचे आत्येमामा रविंद्र वायाळ, आत्या रेणुका वायाळ (शेळके), आजी विमलबाई शेळके व त्याच्या चैतन्य गुरुकुल येथील शिक्षकांना देतो. दैनिक युवा आदर्शचे संपादक दीपक शेळके यांचा तो मुलगा आहे.
आदीराज यास गणितात 98, इंग्रजीत 96, विज्ञान 94, हिंदी 88, मराठी 94 सोशल सायन्स या विषयात 90 गुण मिळाले असून एकूण 500 पैकी 472 गुण मिळवून त्यांने 94.40 टक्केवारी मिळविली आहे. चैतन्य गुरुकुल व ज्युनियर कॉलेजमध्ये म्हणजेच शाळेतून तो पाचवा आला आहे.
त्याच्या या यशाबद्दल त्याचे चैतन्य गुरुकुलचे संस्थाचालक आशुतोष चौधरी, राजेश ठेंग, मधुकर अंभोरे, शिवकुमार नागपुरे, हर्षवर्धन सावळे, लक्ष्मण परिहार, सौ. शारदा जोशी, जय मुळावकर आदी शिक्षकगण तसेच दीपक शेळके, रविंद्र वायाळ, रेणुका वायाळ, वर्षा शेळके, भारत बोराडे, उदयराज शेळके, रेखा जाधव, दिलीप कळणे, चंदा केंधळे, साक्षी भुतेकर, भगवान जाधव, निलावती बोराडे, उद्धव केंधळे, सुधाकर खरात, केदार गोरे, आनंद जाधव, शितल केंधळे, दिंगबर मानवतकर, प्रविण गोरे, शितल मानवतकर, सोनाली गोरे, मीना काळे-आगळे, कमलताई तुल्ले, माऊली कळणे, अंकीता बोराडे, संदीप भाकरे यांच्यासह मित्र परिवारातून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.