*जबरी चोरीचे गुन्हयातील आरोपीस अटक, गुन्हयात वापरलेली मोटारसायकल आणि चोरलेला मोबाईल चोरटयाकडुन केला जप्त*

जालना /एक इसम दिनांक 10.05.2025 रोजी रात्री महिंद्रा शो रुमचे पाठीमागील पुलाजवळून रस्त्याने मोबाईल वर बोलत जात असतांना चोरट्यांनी त्यास पकडुन त्याचेजवळचा मोबाईल बळजबरीने हिसकावुन घेतला व पळुन जात असतांना त्या इसमाने एका चोरटयास स्थानिक नागरीकांचे मदतीने पकडून पोलीस ठाणे चंदनझिरा यांचे स्वाधीन केले होते, त्यासंदर्भात पोलीस चंदनझिरा जि जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन नागरीकांनी पकडलेला आरोपी नामे विशाल संतोष टाकळकर रा नुतन वसाहत जालना यास गुन्हयात अटक करुन त्याचा पोसीआर घेवुन गुन्हयाचा सखोल तपास करुन त्याचेकडुन इतर दोन आरोपीतांचे नावे निष्पण्ण करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोउपनि / सैय्यद अफसर हे करीत आहेत.
सदर गुन्हयाचे तपासात पळुन गेलेले दोन्ही आरोपीतांची नावे निष्पण्ण करुन त्या दोन आरोपीतांपैकी एक आरोपी हा नुतन वसाहत येथे असल्याचे खात्रीलायक गुप्त बातमी पोलीस निरीक्षक श्री सम्राटसिंग राजपुत यांना मिळालेवरुन त्यांनी पथकामार्फतीने तात्काळ आरोपी नामे यश ऊर्फ अजय विनोद भालेराव रा नुतन वसाहत जालना यास ताब्यात घेवुन त्यास नमुद गुन्हयाचे तपासकामी अटक करुन त्याचा पीसीआर घेवुन पीसीआर दरम्यान त्यास विचारपुस करुन त्याचेकडून तीनही आरोपीतांनी गुन्हयात वापरलेली हिरो होन्डा एच एफ डिलक्स मोटार सायकल आणि फिर्यादीचा बळजबरीने हिसकावून चोरुन नेलेला रेड मी कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयातील एक आरोपी फरार असुन त्याचा शोध घेणेकामी पथकाची नेमणुक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगीरी मा. श्री. आयुष नोपाणी, प्रभारी पोलीस अधीक्षक, जालना, मा. श्री. अनंत कुलकणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग जालना यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे चंदनझिरा पोलीस निरीक्षक सम्नाटसिंग राजपुत, पोउपनि / सचीन सानप, पोउपनि एम बी स्कॉट, पोउपनि / सैय्यद अफसर यांचेसह पथकातील अंमलदार विशाल लोखंडे, गजानन जारवाल, संतोष वनवे, शिवाजी जमधडे यांनी केली आहे.