चंदनझीरा येथील सय्यद निजाम यांचे अपघाती निधन
अनेक वर्षापासून गतिरोधक बसवण्याची चंदनझीरा प्रभागातील नागरीकांची मागणी

चंदनझीरा येथील सय्यद निजाम यांचे अपघाती निधन
सर्व समाजातील नागरीकांचा दफनविधी मध्ये मोठ्या संख्येने सहभागी.
इंद्रायणी हाॕटेल समोर तात्काळ गतिरोधक बसवण्याची मागणी…
अनेक वर्षापासून गतिरोधक बसवण्याची चंदनझीरा प्रभागातील नागरीकांची मागणी
दि. 8 जून 2025 रोजी जालना शहरातील इंद्रायणी हॉटेल समोरिल औरंगाबाद रोड वर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ नेते सय्यद निजाम छोटू मियाँ रा. इस्लामपूरा चंदनझीरा जालना यांचा आपघत झाला. सय्यद निजाम यांना हॉटेल इंद्रायणी समोर आपल्या मित्राला भेटायचा होतं. मित्र औरंगाबाद रोड वर उभा होता. रात्री 9 : 20 वा. दरम्यान सय्यद निजाम यांनी हॉटेल इंद्रायणी समोर दुचाकी गाड़ी पार्क केली. डिवायडर ओलांडून सय्यद निजाम आपल्या मित्राला भेटण्यासाठी पायी गेले.मित्राची भेट घेतली. आणि पुन्हा डिवायडर ओलांडून हॉटेल इंद्रायणी कडे परतले त्याचवेळी एका भरधावेगाने कार ने सय्यद निजाम यांना धडक दिली. सदर आपघातात सय्यद निजाम यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली. उपचार साठी सय्यद निजाम यांना औरंगाबाद येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर उपचारा दरम्यान सय्यद निजाम यांच्या दुखद निधनाची बातमी प्राप्त झाली. या बातमी मुळे शहरात शोककळा पसरली.
आज दिं 10 जून दुपारी 2 वाजता सय्यद निजाम यांची नमाज ए जनाजा चंदनझीरा येथील इस्लामपूरा कब्रिस्तान मध्ये पठण करण्यात आली असून दफनविधी जवळच्या कब्रिस्तान मध्ये पार पडली. सय्यद निजाम यांच्या दफनविधी मध्ये मुस्लीम समाजासह हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
*चौकट*
हॉटेल इंद्रायणी च्या बाजुला चंदनझीरा मध्ये प्रवेश करण्यासाठी मोठा कॉर्नर आहे. मात्र तिथे ईंद्रायणी हाॕटेल समोर रोडवर एक ही गतिरोधक नाही. महामार्गावर दोन्ही ही बाजू ने उतार असल्याने वाहने भरधाव वेग धारण करतात. या ठिकाणी ब्रेकर नसल्याने दोन्ही बाजूने उतार चा रस्ता असल्यामूळे आपघाताचे प्रमाण जास्त.
यापुर्वी हॉटेल इंद्रायणी समोर अनेक वेळा आपघात झाले यामध्ये अनेक जणांना प्राण गमवावे लागले. मात्र महानगर पालिका प्रशासन या कडे दुर्लक्ष करत आहे. याच ठिकाणी आपघातमुळे अनेकांचा मुत्यू झालाय. दरम्यान याच ठिकाणी झालेल्या आपघातमुळे जालनेकरांनी एक मोठा समाज सेवक आणि नेतृत्व गमावलाय अत्ता तरी जालना शहर महानगर पालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेवून हॉटेल इंद्रायणी समोर गतिरोधक बसवण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे…