महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी अच्युत मोरे यांची निवड*

*महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी अच्युत मोरे यांची निवड*
जालना येथील पत्रकार अच्युत मोरे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नांदेड येथील विभागीय बैठकीत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत आणि राज्य सरचिटणीस सुजाता खानोरे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र देऊन मोरे यांच्यावर जालना जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे बोलविण्यात आलेल्या विभागीय बैठकीत पत्रकारांच्या विविध समस्यावर चर्चा करण्यात आली. दरम्यान जालना येथील पत्रकारांसाठी घरकुल योजना राबविण्याचा मनोदय प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी बोलून दाखविला. आगामी काळात पत्रकार संघाची ध्येयधोरणे राबवणे, दरवर्षी नवीन सभासद नोंदणी करणे, शहर, जिल्हा कार्यकारणीचे पदाधिकारी नियुक्त करणे, जिल्हातील सर्व तालुका अध्यक्ष नेमणूक करून कार्यकारणी तयार करणे यासह पत्रकार संघाची कामे प्राधान्याने करावीत. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कायम अग्रेसर राहिला आहे. त्यासाठी जालना जिल्ह्यातील पत्रकार आणि पत्रकारितेतर कर्मचार्यांच्या समस्या, विविध मागण्या यासाठी काम करावे असे नियुक्तीपत्रात म्हटले आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत, मराठवाडा अध्यक्ष रुपेश पाडमुख, नांदेड जिल्हाध्यक्ष श्रीधरराव नागापुरकर, परभणी जिल्हाध्यक्ष रमेश नाटकर, हिंगोली जिल्हाध्यक्ष आय. डी. पठाण, जालना जिल्हाध्यक्ष अच्युत मोरे यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थिती होती.