केबल चोरी करणारे तीन आरोपी अटक 1,40,000/रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल चोरी करणारे तीन आरोपी अटक
1,40,000/रुपयांचा मुद्देमाल जप्त
परतूर/प्रतिनिधी
परतुर पोलिस ठाणे हद्दीत सोलर प्लांटवर होणाऱ्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री.बंसल यांनी आदेश करून सूचना केल्या होत्या.
त्यावरून दिनांक 27/08/2028 रोजी पोलीस ठाणे परतूरचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांना माहिती मिळाली की, मोजे खांडवी तालुका परतुर येथे सोलर प्लांट वरील चोरी ही आरोपी नावे समीर काळे व त्याच्या साथीदाराने केली असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली असल्याने पोलीस ठाणे परतुर येथील अधिकारी आमदार यांनी संशयित आरोपी नामे समीर काळे यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर चोरी त्याचे साथीदार नामे सय्यद असेफ व शेख गौस याच्यासह केल्याची कबुली दिली.
त्यांच्याकडे इतर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी इतर तीन गुन्हे मोजे मसला शिवारातील टाटा सोलार येथे केल्याचे कबुली केली आहे.
सदर तीनही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल माल तांब्याचे वायर किंमत 1,40,000/ रुपयांचे जप्त केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री.अजयकुमार बसंल,अपर पोलीस अधीक्षक श्री.आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे परतुरचे पोलीस निरीक्षक श्री.एस.बी.भागवत, श्री. पल्लेवाड,पोउपनी,अंमलदार अशोक गाढवे,गजानन राठोड, ज्ञानेश्वर वाघ, नरेंद्र चव्हाण, राम हाडे, विजय जाधव, गोविंद पवार अच्युत चव्हाण, नितीन बोंडारे यांनी केलेली आहे.