…शेवटी आयुक्त संतोष खांडेकर लाचेच्या मोहात अडकले
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई; दहा लाखांची लाच स्वीकारताना अटक.
…शेवटी आयुक्त संतोष खांडेकर लाचेच्या मोहात अडकले
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई; दहा लाखांची लाच स्वीकारताना अटक
जालना (प्रतिनिधी) – जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर हे आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाच्या कारवाईत दहा लाख रुपये लाच स्वीकारताना रंगेहात अटक झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराकडून प्रशासकीय कामकाजासंदर्भात सोय करण्याच्या मोबदल्यात दहा लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ACB च्या अधिकाऱ्यांनी जाळे रचून आज प्रत्यक्ष कारवाई केली.
कारवाईदरम्यान आयुक्त संतोष खांडेकर यांनी कथितपणे मागितलेली लाच स्वीकारल्याचे आढळल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाकडून सुरू आहे.
या घटनेमुळे जालना महानगरपालिकेत तसेच शहरात मोठी खळबळ उडाली आहे. नागरिक आणि कर्मचारीवर्गामध्ये या कारवाईची मोठी चर्चा रंगली असून, प्रशासनातील प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
