शहीद भगतसिंह शाळेत संविधान जनजागृती दिवस साजरा

जालना:
जालना : चंदनझिरा भागात शहीद भगतसिंह शाळेत सविधान जनजागृती दिवस मंगळवार रोजी “संविधान संवाद समिती,जालना” यांच्यावतीने भारतीय संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठीची कार्यशाळा शहीद भगतसिंह विद्यामंदीर,चंदनझिरा,जालना येथील शाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता.कार्यशाळेसाठी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून “संविधान संवाद समितीचे जिल्हा सचिव” तथा जि.प.प्रा.शा.हालदोला चे शिक्षक श्री.प्रदीप घाटेशाही तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेते तथा शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळ,छत्रपती संभाजीनगर संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री अण्णा सावंत साहेब यांची उपस्थिती होती.कार्यशाळेची सुरुवात राष्ट्रगीत,राज्यगीत व संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून करण्यात आली.त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विद्यार्थ्यांना विविध संविधान बालगीताद्वारे व भारुडाच्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीने मुलांचा उत्साह वाढवत संविधानामधील मूल्य,महापुरुषांचे विचार,बंधुता यांची ओळख करून दिली.कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोपप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मा.सावंत साहेबांनी संविधान प्रचाराच्या कार्यशाळेमध्ये छान पद्धतीने मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.कार्यक्रमासाठी सर्वश्री मुख्याध्यापक दत्ता खारतुडे,प्रवीण गातवे,बळीराम बागल, विशाल वाहुळे,श्रीम.विद्या गावडे व श्री.पूजा राठोड आदी शिक्षकांची व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.