गोंदी जवळील कौठाळागावात जबरी चोरी
दिड तोळे सोने, 16 हाजारांची चांदी नगदी बारा हाजार रोख रक्कम हातोडी व चाकूने वयोवृद्धाला मारत चोरटा झाला लंपास
शहागड प्रतिनिधी : अबंड तालुक्यातील कौठाळा येथे श्रीरंग शहादेव गुळवणे वय 62 वर्ष रा. कौठाळा खुर्द येथिल वयोवृद्धाच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्याने शुक्रवारी 27 मार्च रोजी रात्री दिड वाजेच्या सुमारास पती- पत्नी असे त्यांच्या घरी झोपलेले असतांना घराचे कुलूप तोडुन कपाटातील रोख रक्कम व दागीने काढतांना एक अज्ञात आरोपी चोरटा
शहादेव गुळवणे यांने दिसला त्यांनी
त्यास अडवण्याचा प्रयत्न केलेला असतांना चोरट्यांने
शहादेव गुळवणे यांच्या डोक्यात हातोडी व छातीत हातातील चाकू मारत गंभीर जखमी केले आणि डाव्या हाताला त्यांच हातोडी ने मारत जबर दुखापत करत बळजबरीने चोरी करत कपाटातील
बारा हाजार रुपये नगदी रोक रक्कम साठ हाजार रुपये किंमतीचे 10 ग्रॅम कानातील झुंबर दोन जोडी, 5 ग्रॅमची अंगठी आसे 15 ग्रॅम सोने व सोळा हाजार रुपयांची 20 ग्रॅम वजनाचे चांदीचे पायातील चैन जोडी आसा एकूण 88 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल
रोख रक्कम दागीने घेवून चोरटा पसार झालेला असून या प्रकरणी शहादेव गुळवणे यांच्या फिर्यादीवरून गोंदी पोलीस ठाण्यात कलम 331 (4), 309 (6), 311 भारतीय न्याय सविता अन्वेय गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास
पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत हे करीत आहेत. या घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी घटनास्थळी भेट दिली असून चोरट्याचा शोध घेतला जात आहे.
जखमी वृद्धावर सरकारी दवाखान्यात सध्या उपचार चालू आहेत.