Uncategorized
जालना जिल्हा व्हाईस ऑफ मिडिया पत्रकार संघाकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव साजरी करण्यात आली….!

जालना जिल्हा अध्यक्ष सुयोग खर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली आज मस्तगड येथिल परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली असून यावेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विकासकुमार बागडी जिल्हा उपाध्यक्ष सय्यद अफसर, सचिव शब्बीर पठाण शिवाजी बावणे,शहर अध्यक्ष देवचंद सावरे,शहर सचिव गोपाल गोमतीवाले,युवराज कुरील, राजेश गौड,आकाश माने,नटवर किल्लेदार आदी सदस्यांनी उपस्थित लावली यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आज शहर संघटनेत आकाश माने, राजेश गौड आणि किल्लेदार यांचा समावेश करण्यात आला असून सहसचिव पदी आकाश माने राजेश गौड यांची कोषाध्यक्ष तर शहर सह संघटक पदी नटराज किल्लैदार यांची नियुक्ती जिल्हा अध्यक्ष सुयोग खर्डेकर यांनी केली असून प्रदेश उपाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी सहमती दिली आहे…