जालन्याच्या बदनापूर मध्ये अवैधरित्या गांजा वाहतूक करणारा एक जण जेरबंद…
जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि बदनापूर पोलिसांची संयुक्त कारवाई

3 किलो 839 ग्राम गांजा आणि 1 स्कूटी असा एकूण 1 लाख 51 हजार 780 रुपये किंमतीचा मुद्देमाल जब्त.
: जालन्याच्या बदनापूर मध्ये अवैधरित्या गांजा वाहतूक करणाऱ्या एकास पोलिसांनी जेरबंद केलंय. जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि बदनापूर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केलीय. या कारवाईत 3 किलो 839 ग्राम गांजा आणि 1 स्कूटी असा एकूण 1 लाख 51 हजार 780 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बदनापूर पोलीस ठाणे हद्दीतील बदनापूर ते औरंगाबाद रोडवर एक इसम स्कूटीवरून गांजाची अवैधरित्या वाहतूक करत असल्याची माहिती जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि बदनापूर पोलीस पथकाला मिळाली होती. त्या माहितीवरून जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि बदनापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून सदरील व्यक्तीस ताब्यात घेतलं. अजय संजय चावरे (वय 26 वर्ष) असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नावं आहे. या प्रकरणी सदरील व्यक्तीविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बदनापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.