जालना अतिवृष्टी आणि अनुदान वाटप घोटाळा प्रकरणी 10 तलाठ्यांच निलंबन
जिल्हाअधिकारी श्रीकृष्ण पांचाळ

जालना अतिवृष्टी आणि अनुदान वाटप घोटाळा प्रकरणी 10 तलाठ्यांच निलंबन….
जालना: जालन्यात शेतकऱ्यांना अतिवृष्टी व गारपीटीची नुकसान भरपाई म्हणून मंजूर झालेल्या अनुदान वाटपात बनावट शेतकरी दाखवून 26 अधिकाऱ्यांनी तब्बल 35 कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचं समोर आलं.या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने 10 तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.जालना जिल्ह्यात 2022 ते 2024 मध्ये अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल होत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून दिलेल्या अनुदान वाटपात गैरव्यवहार झाला असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार चौकशी केली असता अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील गावातील 26 ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी तब्बल 35 कोटी हडपले असल्याच उघडकीस आल आहे. यातील दहा तलाठ्यांचे निलंबन करण्यात आल असून
इतर तलाठ्यांचे खुलासे घेवून त्यानुसार अभिलेख तपासून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.