पालकमंत्री पंकजा मुंडेंना निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकरी आंदोलकाला पोलिसांनी ढकलून देऊन जमिनीवर पाडले..
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर घडला प्रकार

पालकमंत्री पंकजा मुंडेंना निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकरी आंदोलकाला पोलिसांनी ढकलून देऊन जमिनीवर पाडले..
जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील घटना
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर घडला प्रकार
जालना :आज दिनांक 14 शनिवार रोजी संध्याकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशा मागणीचं निवेदन पालकमंत्री पंकजा मुंडेंना देण्यासाठी आलेल्या शेतकरी आंदोलकाला पोलिस अधिकारी साबळे यांनी ढकलून देऊन जमिनीवर पाडलं आहे.जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही घटना घडलीय.पालकमंत्री पंकजा मुंडे यांची जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर पंकजा मुंडे अमरावतीकडे निघालेल्या असताना ही घटना घडली.दरम्यान या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.गजानन उगले असं या शेतकरी आंदोलकाचं नाव आहे उगले हे घनसावंगी तालुक्यातील शेतकरी आहेत.शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत उगले हे सतत आंदोलन करत असतात.