जालना शहरातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था — तातडीने कारवाईची मागणी

जालना प्रतिनिधि.
जालना शहर व जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुंडगिरी, चोरी, धमकावणे, खंडणी, लुटमारी आणि जीवघेणे हल्ले अशा गंभीर घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास डळमळीत झाला आहे.
नवीन मोंढा परिसरात व्यापारी आणि शेतकरी वर्गावर सतत गुंड प्रवृत्तीचे लोक हल्ले करत आहेत. या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्याची मागणी मागील १०-१२ वर्षांपासून होत असतानाही त्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष केले गेले आहे.
👉 मागण्या:
1️⃣ शहर व जिल्ह्यात पोलिस गस्त आणि नाकाबंदी वाढवावी.
2️⃣ गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी.
3️⃣ सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कार्यक्षमता तपासून नियमित निरीक्षण करावे.
4️⃣ रात्री संवेदनशील भागात पोलिस पेट्रोलिंग वाढवावे.
5️⃣ नागरिकांसाठी पोलिस हेल्पलाइन तत्पर ठेवून तक्रारींवर तात्काळ कारवाई व्हावी.
🔴 जालना शहराच्या शांततेसाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, ही आमची ठाम मागणी आहे.
आज जालना पोलीस अधीक्षक यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
या वेळी मा.आ. अर्जुनभाऊ खोतकर (माजी मंत्री), मा.मंत्री राजेशजी टोपे, भास्करराव आंबेकर, मा.आ. संतोष सांबरे, राजाभाऊ देशमुख, राजेंद्र राख, संजय मुथा, बबलू चौधरी, विनीत सहानी, अतिक खान, नरेंद्र मित्तल तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

